मोहित स्पोटर्स आग्राव संघ विजेता
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
श्री महाजनाई स्पोर्ट्स क्लब आयोजित नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन बुधवारी (दि.22) करण्यात आले. या स्पर्धेत मोहित स्पोटर्स आग्राव संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला कै. अंकित हरेश पारंगे व रत्नदिप नारायण पारंगे स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी (दि.22) रात्री झाला. या स्पर्धेत एकूण 32 संघाने सहभाग घेतला होता. रात्रभर ही स्पर्धा रंगली. प्रत्येक संघाने विजय मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. काही सामने चुरशीचे झाले, तर काही सामने एकतर्फी झाले. अंतिम सामना गुरुवारी (दि.23 ) सकाळी झाला. त्यामध्ये मोहित स्पोटर्स आग्राव संघ अंतिम विजेता ठरला. या संघाला चषक व दहा हजार रुपये असे प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देऊन गौरवण्यात आले. बापदेव भेरसे संघाला द्वितीय क्रमांकाचे रोख सात हजार रुपये व चषक, मिरा स्पोटर्स आग्राव संघाने तृतीय व श्री महाजनाई स्पोटर्स क्लब (ब) या संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. या दोन्ही संघांना प्रत्येकी चार हजार रुपये व चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच, उत्कृष्ठ फलंदाज म्हणून अनिकेत म्हात्रे (भेरसे) मालिकावीर म्हणून अभिराज (आग्राव) आणि उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून विवेक यांना चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण विलास भोनकर, शशीकांत पाटील, तुषार गुंड, रुपेश पाटील, राजाराम पारंगे, सुबोध पारंगे, सतिश पारंगे, अरविंद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री महाजनाई स्पोटर्स क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन विनायक भोनकर, रुपेश पाटील, स्वप्नील पारंगे, संकेत पारंगे यांनी केले.





