कळंबोलीच्या कमानीवर  ग्रामपंचायतीचाच उल्लेख

नगरसेवक रविंद्र भगत यांचे निवेदन
 पनवेल | वार्ताहर |
 पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली गाव हे पालिकेत समाविष्ट करण्यात येऊन देखील पनवेल महानगरपालिकेच्या वतीने केवळ कळंबोली असा उल्लेख होत असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. सदरबाबत कळंबोली – पनवेल महानगरपालिका असा उल्लेख येथील गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कमानींवर केला असून तो कळंबोली गाव पनवेल महानगरपालिका असा करण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक नगरसेवक रवींद्र अनंत भगत यांनी पालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कळंबोली येथे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना येथील नागरिकांच्या समस्या झटक्यात सोडविल्या जात होत्या, मात्र पनवेल महापालिकेत हे गाव समाविष्ट झाल्यानंतर येथे नागरी सुविधांचा खेळखंडोबा झाला आहे. याठिकाणी बांधण्यात आलेल्या कमानींवर आजही कळंबोली गाव च्या ऐवजी कळंबोली असा उल्लेख असल्यामुळे तात्काळ याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.  कळंबोली येथील नागरिकांच्या तक्रारीनंतर आता येथील शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रवींद्र अनंत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबत लेखी निवेदन वजा तक्रार करून या कमानींवर कळंबोली – पनवेल महानगरपालिकाअसलेला उल्लेख काढून त्याऐवजी कळंबोली गाव – पनवेल महानगरपालिका असा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.  

Exit mobile version