मेढेखार येथे गुणवंतांचा सत्कार

| भाकरवड | वार्ताहर |

पारंपरिक गौरी गणपती उत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारे मेढेखार, ता. अलिबागचे आदर्श शिक्षक ज.का. ठाकूर यांच्या कुटुंबियांकडून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

दामोदर पाटील, निवृत्त आरसीएफ अधिकारी, ज्योती संतोष तुरे- लॉकडाऊनच्या काळातही आदिवासी भागात अध्ययन, आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित, जीविता पाटील- अंगणवाडी सेविका, नंदन पाटील- जिल्हा परिषदेकडून गुणवंत कामगार म्हणून गौरव, श्रुतिका धनंजय पाटील इंजिनिअरिंगमध्ये 92% गुणांनी पुणे विद्यापीठात प्रथम, स्वरुप सुदर्शन शेळके, बाटू विद्यापीठात डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये 99.7% गुणांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा मान, मनाली राजेंद्र पाटील डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये 87% गुणांनी पेण पॉलीटेक्नीकमध्ये प्रथम येण्याचा मान, सुचित दिलखुश पाटील सन 2021 मध्ये 12 वी शास्त्र शाखेत सीबीएसईमध्ये 93% गुणांनी रायगड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान, ऋचा सुगम ठाकूर एसएससीमध्ये 94.20% गुणांनी सेंट मेरी विद्यालय उरणमध्ये प्रथम येण्याचा मान, भाग्यश्री मच्छींद्र पाटील एचएससी शास्त्र शाखेत विशेष प्रावीण्य मिळवत गावातून प्रथम येण्याचा मान, श्रावणी अमर थळे आंतरराष्ट्रीय कौन्सिल फ्रान्स आयोजित अखिल भारतीय भरतनाट्यम स्पर्धेत सर्वोत्कृष्ट डान्सर पुरस्काराने सन्मानित. तसेच इयत्ता पाचवीत शिष्यवृत्ती मिळाली, दीपक पाटील, नायब तहसीलदार माणगाव यांनी महसूल खात्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव प्रशासनाने केला आहे.

ज्येष्ठ नागरिक संघ कुसुंबळे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील गरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी श्री सुगम ठाकूर, अभियंता जेएनपीटी यांनी स्मार्ट शिक्षणाचा आराखडा मांडला. गजानन पाटील ओमान सौदी अरेबिया येथे उच्च अधिकारी असून, या स्मार्ट शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रे संचालनही केले. उच्चशिक्षित आणी जेष्ठ नागरीक यानी एकत्रीतपणे आपल्या गावच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी स्मार्ट शिक्षण ही अभ्यास प्रणाली राबविण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन केले गेले.

Exit mobile version