बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

| नागोठणे | वार्ताहर |

कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील विद्यालय व कै. स. प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयातील ई.10 वी व ई.12 वी च्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुरुवारी (दि.6) सकाळी विद्यासंकुलातील सभागृहात शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलेे. यावेळी विद्यासंकुलाचे प्राचार्य ए. सी. चुनके, शाळा समिती सदस्य अनिल काळे, अ‍ॅड. सोनल जैन, पी. एम. सोलेगावकर, ए. आर. गावित, संतोष गोळे, एन. एन. गायकवाड, आर. टी. झेडगे, आर. के. जगताप, कांचन पारंगे, साक्षी शिंदे, संध्याराणी सरगडे, मेघना म्हात्रे, मानसी शिंदे, कैलास गाडे,अमित म्हात्रे, प्रगती बहुरुपी आदी शिक्षकांसह पालक प्रतिनिधी दत्ता श्रीवर्धनकर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ए. सी. चुनके, सूत्रसंचालन संध्याराणी सरगडे यांनी तर आभार प्रदर्शन एन. एन. गायकवाड यांनी केले.

Exit mobile version