| नागोठणे । वार्ताहर ।
कोकण एज्यकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील एस. पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे युवकांचा ध्यास- ग्रामीण विकास, व्यक्तिमत्त्व विकास व श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव कडसुरे (ता. रोहा) येथे 4 ते 10 डिसेंबर या दरम्यान उत्साहात संपन्न झाले. या श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन शाळा समितीचे सदस्य अनिल काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कडसुरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र शिर्के, अॅड. सोनम जैन, दत्तात्रय शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या निवासी शिबिरात 29 मुले व 46 मुली असे एकूण 75 स्वयंसेवक सहभागी झाले होते. या शिबिरादरम्यान गाव स्वच्छता, जलसंधारण स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, वाद -विवाद हास्य कल्लोळ, योगाचे धडे देण्यात आले. तर व्यसनमुक्ती मोबाईल, शाप की वरदान या संबंधित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी नरेंद्र जैन, प्रा. एम.के. पाटील, राजेंद्र शिंदे, रविंद्र शिर्के यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अबेसिंग गावित, यांनी तर सूत्रसंचालन एस.पी. मिसाळ यांनी केले.