गोखले शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

| श्रीवर्धन | वार्ताहर |

येथील गोखले एज्युकेशन संस्थेच्या, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी, (दि. 20) जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व एचएससी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने गुणानुक्रम मिळवुन प्रथम आल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी व उपप्राचार्य प्रा. किशोर लहारे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

दरम्यान, कॉलेज कॅम्पसमधील न्यू मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम आल्याबद्दल मनस्वी मनोज भुसाने, श्रीवर्धन हिचाही प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना टिकून राहावयाचे असल्यास कष्ट व मेहनत करून अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, असे गौरवोद्गार काढले. तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव आयोजित केल्याबद्दल स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य व पालक वर्गाकडून महाविद्यालयाचे कौतुक व समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version