| आंबेत | वार्ताहर |
देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. म्हसळा तालुक्यातील आंबेतमधील सावित्री माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्तीपर कार्यक्रमात सहभाग घेत अनेक कलाकृती सादर केल्या. यामध्ये भाषणे, देशभक्तीपर गीत, कवायती, संगीत योगासने, परेड, मानवी मनोरे आशा अनेक उपक्रमांतून नागरिकांना आपली प्रात्यक्षिके करून दाखविली.
याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सावित्री विद्यालयात संविधान गुणगौरव परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळादेखील संपन्न झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान गुणगौरव परीक्षेस मराठी माध्यम 32 विद्यार्थी, उर्दू माध्यम 35 विद्यार्थी असे एकूण 67 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांना यावेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. संविधान गुणगौरव परीक्षेत केंद्रप्रमुख म्हणून शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सविता म्हात्रे यांनी विशेष कार्य पार पाडल्याने त्यांचे यावेळी विद्यार्थ्यांसमवेत सत्कारदेखील करण्यात आले. दरम्यान, प्रथम क्रमांक नेहा नितीन वाघरे, द्वितीय अलीना इरफान रहाटविलक, तृतीय क्रमांक सिद्धी महेश रेवलेकर या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.