| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजात अभियंता वर्गाची भूमिका आणि त्यांची कामाबद्दलची बांधिलकी महत्वाची असल्याचे कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे. कर्जत येथे जिल्हा परिषद अभियंता दिनाच्या निमित्ताने ‘अभियंता सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होते. कर्जत येथील रॉयल कॅम्प येथे रायगड जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अभियंता संघटनांच्यावतीने अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियंता दिनाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे, बांधकाम विभागाचे राहुल देवांग, संघटनेचे अध्यक्ष सुजित धनगर आणि कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील 15 तालुक्यातील उप विभागाचे उप व शाखा अभियंता, संघटनेचे माजी अध्यक्ष सदानंद शिर्के, सुरेश इंगळे, परब, शाखा अभियंता गोपाने, मते व मंगेश सावध आदी उपस्थित होते.
कर्जतमध्ये गुणवंत अभियंत्यांचा सन्मान
