मेस्सीची ऑलिम्पिकमधून माघार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

फुटबॉल सुपरस्टार असला तरी आता लागोपाठ स्पर्धा खेळण्याचे वय राहिले नाही, त्यामुळे लिओनेल मेस्सीने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. परिणामी, विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाला मेस्सीशिवाय खेळावे लागणार आहे. 36 वर्षे वय असलेला मेस्सी 20 जून ते 14 जुलैदरम्यान अमेरिकेत होत असलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी लढणार आहे. त्यानंतर लगेचच 26 जुलैपासून पॅरिस ऑलिंपिक सुरू होत आहे.

मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिंपिकमध्ये फुटबॉलसाठी 23 वर्षांखालील खेळाडू खेळवण्याचा नियम आहे, मात्र तीन व्यावसायिक दर्जाचे (वयोगटाचे बंधन नसलेले) खेळाडू खेळवू शकतात. पॅरिसमध्ये संघासोबत राहण्यास आम्ही मेस्सीला आग्रह केला आहे, असे अर्जेंटिनाच्या 23 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक झेव्हियर मस्कारेन्हो यांनी सांगितले. मी मस्कारेन्हो यांच्याशी चर्चा केली आहे आणि दोघांनाही सत्य परिस्थिती माहिती आहे, असे मेस्सीने स्पष्ट केले.

क्लब फुटबॉल त्यानंतर आता कोपा अमेरिका आणि ऑलिंपिक सलग तीन महिने स्पर्धा आहेत, त्यामळे ऑलिंपिकचा मी सध्या विचारही केलेला नाही. तसेच प्रत्येक स्पर्धेत खेळावे, असे आता वय नाही. कोणत्या स्पर्धांत खेळायचे याची निवड मला सर्व परिस्थितीचा विचार करून करावा लागणार आहे. ऑलिंपिकमध्ये मस्कारेन्हो यांच्यासोबत खेळून सुवर्णपदक मिळवता आले हे माझे भाग्य आहे, त्या सुवर्ण आठवणी मी विसरू शकत नाही, असे मेस्सीने सांगितले.

Exit mobile version