| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावर शुक्रवारी (दि.5) दुपारी टँकर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. ही घटना मैनुशेठ वाडा येथे घडली असून मुंबईकडून अलिबागकडे आरसीएफ कंपनीकडे येत असताना हा अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला टँकर असल्याची माहिती समोर येत आहे. टँकर चालक तेथून पसार झाला आहे. या घटनेची माहिती जिल्हा वाहतूक शाखेला मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फायरब्रिगेडला पाचारण करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र चालकाला दुखापत झाली आहे. चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. टँकरमध्ये असलेल्या केमिकलला गळती लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोयनाड पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरसीएफ कंपनीलादेखील कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मिथेनॉल केमिकलचा टँकर पलटी
