एमआयडीसीने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी: शौकत मुकादम

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| चिपळूण | प्रतिनिधी |

चिपळूण शहरानजीक फरशी येथे सोमवारी (दि.08) रात्री अचानक एमआयडीसीची पाईपलाईन फुटली. यामुळे आजूबाजूच्या दुकानदाराचे फार मोठे नुकसान झाले आहे. या दुकानदारांना एमआयडीसीने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत माजी सभापती शौकत मुकादम यांनी भेट दिली. दुकानदारांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई एमआयडीसीने ताबडतोब करावी, अशी सूचना मुकादम यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच, भविष्यात पाईपलाईन फुटणार नाही याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे ठणकावून सांगितले. वेळोवेळी पाईपलाईन फुटणे हे योग्य नाही. याचीदेखील काळजी घेतली पाहिजे, असेही सुनावले.

Exit mobile version