| चिपळूण । वार्ताहर ।
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हास्तरावरील शांतता समितीची स्थापना करण्यात आली आहे. मागील समितीचा दोन वर्षांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपुष्टात आल्यामुळे नविन समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, व्यापारी दुकानदार, उद्योजक , कामगार, निवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस मित्र, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील आ. शेखर निकम, प्रशांत यादव यांच्यासह संजय मारुती चव्हाण, शौकत माखजनकर, नाझीम अफवारे, संतोष कदम, शौकत मुकादम, सुभाष जाधव, अमिन परकार, इम्तियाज मुकादम, संजय बामणे, अनंत साळवी, नितीन ठसाळे, सुचय रेडीज यांचा समावेश आहे. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.