मिलिंद रविंद्र चवरकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा

एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड अंतिम विजयी

| पोयनाड | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित मिलिंद रविंद्र चवरकर स्मृती चषक ज्युनियर वयोगटातील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघांनी अंतिम सामन्यात फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाचा पराभव करून अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीला आलेल्या एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघांनी 40 षटकांत 5 गडी गमावत 246 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात माणगाव संघाचा डाव 36 व्या षटकात 105 धावसंख्येवर आटोपला.

एसबीसी महाड संघांने सामना जिंकत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, फायटर्स माणगाव संघाला द्वितीय क्रमांक, स्पोर्टी-गो कळंबोली आणि भेंडखळ उरण संघाला तृतीय तर प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल व किक-फ्लिक क्रिकेट एरिना खोपोली संघ चतुर्थ क्रमांकावर विजयात ठरले. संपूर्ण स्पर्धेत आपली चमक दाखवणाऱ्या आरुष कोल्हेला मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज अजय जाधव, उत्कृष्ठ गोलंदाज पार्थ म्हस्के, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक श्रेयांश शेडगे व श्रेय पाटील, स्पर्धेतील इमॅर्जिंग प्लेयर म्हणून ऋग्वेद जाधव, अमर बिके, अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून शतकवीर आरुष कोल्हे, स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू निल जाधव, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक देवांश शिंदे, श्रेयांश शेडगे यांना गौरविण्यात आले.

यावेळी अन्वर बुराण, सुनिल पाटील, किशोर तावडे, अजय टेमकर, सुजित साळवी, अजित चवरकर, भूषण चवरकर, डॉ. कोल्हे, अविनाश मेहता, ॲड. पंकज पंडित, पलाश चवरकर, आवेश चिचकर, रोहित काळे, संदिप जोशी, संकेश ढोले, आदेश नाईक सह खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version