बनावट मेसेजने लाखांची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809

| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |

खारघर सेक्टर 20 येथील भूपेंदर कौर मोहिंदर सिंह यांच्या मोबाईलवर महानगर गॅस लिमिटेड संदर्भात एक मेसेज आला. त्यात ‌‘आपले गॅस कनेक्शन बंद होणार असून तात्काळ महिन्याचे बिल अपडेट करा’, असा संदेश देण्यात आला होता. भूपेंदर कौर यांनी आपण बिल भरले असल्याचा स्क्रीनशॉट समोरच्या क्रमांकावर पाठवला. त्यानंतर स्वतःला वरिष्ठ अधिकारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून मार्गदर्शन करण्याचे सांगितले. बोलता बोलता त्यांनी मोबाईलवरील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची संपूर्ण मोबाईल स्क्रीन शेअर झाली. काही मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण 4 लाख 64 हजार रुपये वळते करण्यात आले. व्यवहारांचे मेसेज येऊ लागताच सिंह यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नागरिकांनी अशा बनावट मेसेज, लिंक किंवा कॉल्सना बळी पडू नये, कोणतीही वैयक्तिक अथवा बँकिंग माहिती शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version