। सुतारवाडी । वार्ताहर ।
या वर्षी रोहा तालुक्यातून हजारो भक्तगण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. विशेषत: विठुरायाच्या गजरात हाती पताका घेवून पुई येथून वाडेकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य भक्तगण पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले आहेत. या भक्तगणांचे ग्रामीण भागात ठिकठिकाणी अगत्यपूर्ण स्वागत होत असून ज्या-ज्या ठिकाणी ही पायी दिंडी जाईल त्या-त्या ठिकाणचे भक्तगण या पायी दिंडीत सहभागी होत आहेत. सुतारवाडी येथे दिंडी आल्यानंतर ती दिंडी दत्तमंदिरामध्ये एक दिवस वास्तव्यास होती. यावेळी येथील ग्रामस्थांनी दिंडीतील भक्तगणांची उत्तम प्रकारे व्यवस्था केली होती. या पायी दिंडीत मनोहर साळवी, मोहन दोशी, माणिकराव सावंत तसेच अन्य भक्तगण सहभागी होऊन पंढरपूरकडे रवाना झाले.