| पुणे | प्रतिनिधी |
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अनिस सुंडके यांची उमेदवारी जाहिर केली. सुंडके हे गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडणूक प्रचारासाठी ओवेसी हे आले होते. येथे जाहिर सभा पार पडली.
याप्रसंगी एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी औरंगाबाद व पुणे येथील अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. खासदार ओवेसी यांनी सांगितले की, आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरणार आहोत. आम्ही का निवडणूक लढू नये निवडणूक लढवली पाहिजे, अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. मला खात्री आहे की, पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील. जय भीम, जय मीमचा नारा देत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार उमेदवार अनिस सुंडके व पुण्यातील पक्षाचे सर्व पदाधिकार्यांनी केला.







