। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपारीक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी अलिबकग येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) च्या थळ युनिटला भेट दिली. तिथे आरसीएफच्या उच्च व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत थळ कारखान्यातील ऊर्जा कार्यक्षमता वाढीसाठी सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि ऊर्जा व पर्यावरण संवर्धनासंबंधीच्या प्रस्तावांवर चर्चा केली. त्यानंतर विविध संयंत्रांना भेट देऊन संबंधित कामांची प्रत्यक्ष पहाणी करुन समाधान व्यक्त केले.
तत्पूर्वी आरसीएफ थळच्या प्रशासकिय इमारतीसमोर वृक्षारोपण व कार्यकारी संचालक थळ यांच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले. भेटीदरम्यान सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या प्रतिनीधींची भेट घेऊन आरसीएफने 2021-2022 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मंत्री महोदयांनी कौतुक केले. कोरोना महामारीच्या कठीण काळात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत संकल्पना सुनिश्चित करण्यासाठी आरसीएफच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.
ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांची आरसीएफच्या थळ युनिटला भेट
