नेरळच्या पादचारी पुलावर धावणार मिनीट्रेन

आकर्षक रंगरंगोटी

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील कर्जत एन्ड कंदील नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक अधिक सुसज्ज होत आहे. या स्थानकात अनेक विकासात्मक कामे सुरु असून त्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या नवीन पादचारी पुलाच्या पायर्‍यांवर चक्क नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन चालताना दिसावे असे चित्र रेखाटण्यात येत आहे. आगामी काळात हे चित्र नेरळ स्थानकातील प्रवाशांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

नेरळ रेल्वे स्थानकात अनेक बदल केले जात आहेत. मुंबई दिशेकडे नवीन पादचारी पूल उभारला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पादचारी पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून आता केवळ पुलावरून खाली उतरणार्‍या पायर्‍या यांची रंगरंगोटीचे काम शिलक्क आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र याचे प्रवेशदवार म्हणून माथेरान ओळखले जाते आणि त्यामुळे या स्थानकात बनविण्यात आलेला पादचारी पूल त्या दृष्टीने बनविण्याचे पर्यटन सुरु आहेत. या पुलाचे महत्व म्हणजे हा पूल देखणा आणि आकर्षक दिसून येत आहे. त्या पुलाचे स्थानक भागाकडील बाजूला पारदर्शक काचा लावण्यात आल्या आहेत. तर पुलाच्या पायर्‍यांवर आकर्षक अशी रंगांनी सजवले आहे.

स्थानकातील पायर्‍यांवर नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन चे चित्र रेखाटले जात आहे. नॅरोगेज मार्गावरून चालणारी मिनीट्रेन आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि डोंगर हे सर्व काही पर्यटक प्रवासी यांना मिनीट्रेन मध्ये न बसता अनुभवता येणार आहे. मिनीट्रेन चालली आहे असा भास तो देखावा पाहिल्यावर येत असून मध्य रेल्वेच्या चित्रकारांकडून चित्र रेखाटण्याची काम सुरु आहे.

Exit mobile version