। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील कफ परेड भागात असणाऱ्या मच्छिमार नगर परिसरात सोमवारी (दि.20) पहाटेच्या सुमारास चाळीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचावकार्य सुरू करत चार जणांच्या आगीच्या विखळ्यातून बाहेर काढले. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यश खोत (15) या अल्पवयीन मुलाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर देवेंद्र चौधरी (30) यांची प्रकृती चिंताजनक आहे. विराज खोत आणि संग्राम कुर्णे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.






