। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्यात 15 वर्षाच्या मुलाने 2 रिक्षांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील घोडबंदर आनंद नगर येथे मध्यरात्री ही घटना घडली. घोडबंदर रोडवर 15 वर्षीय मुलाने पिकअप चालवत असताना रिक्षाला धडक देत पिकअप मेट्रोच्या कमानिमित रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.