आरोपीला अटक
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यात एका 75 वर्षीय वृद्धाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आपल्या शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात होती. आरोपी, जो शिक्षिकेचाच वडील आहे, त्याने तिला चॉकलेट आणि फुलांचे आमिष दाखवून दि. 28 जुलै ते 6६ ऑगस्ट या कालावधीत तिचा विनयभंग केला. पीडितेने या कृत्याचा विरोध केला तसेच शिक्षिकेला सांगण्याची धमकी दिली असता आरोपीने तिला सोडून दिले.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी जगन्नाथ सुखदेव सूर्यवंशी (75) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. फडतरे करीत आहेत.





