अल्पवयीन मुलीवर नेरळमध्ये बलात्कार

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ममदापूर येथे सुरु असलेल्या गृहप्रकल्पाच्या आवारात एका मजुराने येथील मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना उघड झाली आहे. दोन महिन्यापासून त्या मुलीवर धमकावून अतिप्रसंग केला जात होता. उत्तरप्रदेश येथील मजूर अनिल सिंग असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने अखेर घरच्यांसमोर हा प्रकार सांगताच तिच्या घरच्यांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठले. नेरळ पोलिसानी घटनेची माहिती घेऊन नेरळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपी अनिल सिंग यास नेरळ पोलिसांनी तात्काळ अटक केली. याबाबत अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक ह्या करीत आहेत.

Exit mobile version