कंटेनरमधील मालाचा अपहार

| पनवेल | वार्ताहर |

चेन्नई, तामिळनाडू येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या 15 लाख रुपयांच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनर चालक मोहम्मद इरफान अकबर खान (रा. हरयाणा) याच्याकडे ब्लू डाकडील वेगवेगळी पार्सल पोहोचवण्याचे काम सोपवण्यात आले होते. तो चेन्नई येथील वेअर हाऊसला पार्सल पोहोचवून तेथे कंटेनर उभा केला व त्यातील सामान न उतरवताच तो मोबाईल बंद करून निघून गेला. दरम्यान यावेळी कंटेनरमध्ये 22 लॅपटॉप गायब होते. याबाबत संबंधित कार्यालयाला मेलद्वारे कळवण्यात आले असता त्यांनी मोहम्मद खान याच्याशी संपर्क साधला. मात्र त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version