। माणगांव । वार्ताहर ।
शाहू संभाजी निकम (16) ,रा.कोगे, ता.करवीर, जि.कोल्हापूर हा पहाटे तीन वाजताच्या सुमारास गस्त घालत असताना माणगांव पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो हरवला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा माणगाव पोलिसांनी त्याच्याकडून त्याचे वडील संभाजी महादेव निकम यांचा मोबाईल नंबर घेऊन माणगांव पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला मुलगा माणगांव बसस्थानक येथे मिळाला असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलिसांनी मुलाला त्याचे वडील व मामा संजय पाटील यांच्या स्वाधीन केले.







