। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील फुंडे येथे राहणारी मुलगी प्रणवी आकाराम राजगे वय वर्षे 18 हि राहत्या घरातून दि.6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 दरम्यान फुंडे कॉलेज येथे एफवायबीएचे अॅडमिशन घेण्याकरिता जाते असे सांगून गेली, ती आजपर्यंत घरी परत आली नाही. याबाबत न्हावा -शेवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रणवी हीचा रंग सावळा, केस काळे कुरळे, उंची 5 फुट 5 इंच अशा वर्णाची महिला कुणास आढळली तर न्हावा-शेवा पोलीस ठाणे 022-27472264 यावर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
फुंडे येथून मुलगी बेपत्ता
