मढाळी येथील विवाहिता बेपत्ता

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
दवाखान्यात जाते असे सांगून निघालेली सुधागड तालुक्यातील मढाळी येथील विवाहिता सोमवारी (ता.4) बेपत्ता झाली आहे. ही विवाहिता हरविल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या संदर्भात पाली पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मढाळी येथील स्मिता विपूल गावडे (वय 20) या आपल्या पतीच्या घरातून सोमवारी (ता.4) सकाळी 10:30 च्या सुमारास पालीला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जाते असे सांगून निघून गेल्या त्या घरी परतल्या नाहीत. त्यानंतर पती विपूल गावडे यांनी पत्नी हरविल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात दाखल केली. स्मिता यांची उंची 5 फूट 4 इंच, रंग सावळा, केस कुरळे, अंगावर निळ्या पांढर्‍या रंगांची साडी त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज, कानात कुड्या, नाकात चमकी, पायात साधी चप्पल असे वर्णन आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास त्वरित पाली पोलीस स्थानकात संपर्क करावा असे आवाहन पोलीस हवालदार एम. एम. लांगी यांनी केले आहे.

Exit mobile version