मुलासह विवाहित तरुणी बेपत्ता

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे येथून एक विवाहित तरुणी आपल्या मुलासह बेपत्ता झाली. चित्रपट पाहण्यासाठी जात आहे, असे सांगून महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासह 15 मार्च रोजी बाहेर पडली. त्यानंतर संध्याकाळ झाली तरी ती घरी परत न आल्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडली नसल्यामुळे तिचे पती अजित दत्तात्रेय पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्या महिलेचे वर्णन रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, मध्यम बांधा, केस काळे व लांब, उंची चार फूट दहा इंच, डोळे काळे, अंगात काळया रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स, पायात सँडल तसेच तिच्या मुलाचे नाव आयांश अजित पाटील (वय 4) रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, मध्यम बांधा केस काळे व बारीक, उंची तीन फूट सहा इंच, डोळे काळे, अंगात राखाडी रंगाची पॅन्ट व कोकम रंगाचा टी-शर्ट पायात तपकिरी रंगाचे बूट, मराठी बोलतो व समजते, असे आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन पाटील हे तपास करीत आहेत. तसेच आपल्याला कुणालाही विवाहित तरुणी मुलासह आढळल्यास उरण पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version