| पनवेल | प्रतिनिधी |
मानसिक रुग्ण महिला ही पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, तिचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत. एरेडला नागमणी (60), रा.डेरवली असे या महिलेचे नाव असून, उंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने गहुवर्णीय, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे वाढलेले आहेत. तिच्या अंगात भगवी साडी व पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी हरवलेेले महिला व बालके विषयी पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रभावीपणे राबविलेल्या शोध मोहिमेंतर्गत वपोनि संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय यादव, म.पो.हवा.बोराटे मो.नं.9821425404 व पो.शि.आर.एस.मुंडे मो.नं.9075311390 येथे संपर्क साधावा.