तरुणी बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरुणी कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सविता सुशिल सोंडे (23) रा.कामोठे असे तीचे नाव असून, उंची 5 फुट 2 इंच, चेहरा गोल, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे लांब, नाकामध्ये चमकी, कानामध्ये प्लॅस्टीक खोटे टॉप असून अंगात सफेद रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व पायात शुज घातले आहेत. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी 022-27431413 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version