न्यू पनवेलमध्ये मिशन लक्ष्यवेध टेबल टेनिस

| रायगड | प्रतिनिधी |

क्रीडा क्षेत्रातील भावी जागतिक विजेते घडवण्याच्या उद्देशाने शासनाच्या मिशन लक्ष्यवेध अंतर्गत मुंबई विभागीय टेबल टेनिस निवड चाचणीला न्यू पनवेल येथे (दि.9) दिमाखात सुरुवात झाली.

या निवड चाचणीसाठी संपूर्ण विभागातून 83 खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र, मिशन लक्ष्यवेधच्या कडक निकषांनुसार छाननी केल्यानंतर केवळ 34 खेळाडू या चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. सहभागी खेळाडूंमध्ये 2 आंतरराष्ट्रीय, 15 राष्ट्रीय आणि 18 राज्यस्तरीय पदक विजेत्यांचा समावेश असल्याने स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. केवळ सामन्यांतील विजय-पराजय न पाहता, खेळाडूच्या सर्वांगीण क्षमतेवर भर देण्यात येत आहे. यासाठी प्रामुख्याने तीन स्तरांवर मूल्यांकन केले जात आहे. मिशन लक्ष्यवेधच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या या खेळाडूंना पुढील टप्प्यावर विशेष प्रशिक्षण आणि सुविधा पुरवल्या जाणार आहेत, जेणेकरून ते ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील.

Exit mobile version