। खेड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने टेबल टेनिस असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यातर्फे, जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 25, 26 व 27 सप्टेंबर 2021 या कालावधीत डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये 11, 13, 15, 17, 19 वर्षाखालील मुला आणि मुलींच्या वयोगटांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकाच्या स्पर्धकांना मेडल्स देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी किंवा कुठल्याही प्रश्नांसाठी 9325449201, 9822639306 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि.22 सप्टेंबर ठेवण्यात आली असून स्पर्धेसाठी रुपये 250 प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत इच्छुक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.