| उरण । प्रतिनिधी |
उरण परिसरात गेल्या काही दिवसांत वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. अचानक गारठा वाढला असल्याने उरण तालुक्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे उरणकरांना दिवस-रात्र हुडहुडी भरत आहे.
उरण परिसरात वातावरणात थंडावा वाढला आहे. पहाटे थंडीचे प्रमाण जास्त असल्याने मॉर्निंग वॉक करणार्या मंडळींना याची चांगलीच झळ बसली आहे. सकाळी दव पडत असल्याने धुक्यामुळे उरण परिसरातील ग्रामीण भागातील रस्ताच हरवल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मार्गावर, धुक्याची तीव्रता कमी-जास्त होत असल्याने वाहनांच्या वेगावरही मर्यादा आल्या आहेत. धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने एकीकडे उरण परिसरातील वातावरण आल्दाददायक झाले आहे. मात्र, थंडी वाढल्याने दुसरीकडे ताप, खोकला, सर्दीसारखे आजार जाणवत असल्याने ज्येष्ठांना थंडीचा त्रास होत आहे.
भाजीपाला, आब्यांला फायदा उरण तालुक्यात थंडी वाढल्याने याचा फायदा वाल, दवावर पिकणार्या भाज्यांना अधिक होत आहे. या काळात तालुक्यातील कडव्या वालाचे पीक चांगले आले आहे. तसेच आंब्यांसाठी थंडी उपयुक्त ठरत असून मोहर देखील चांगला आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उरण तालुक्यात थंडी अधिक वाढली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शेतीवर होत आहे. दवावरच्या भाज्या तसेच वाल, आंबा पिकाला मदत झाली आहे.
मोहन पाटील, शेतकरी