श्रीसदस्यांच्या परिवाराचे मान्यवरांकडून सांत्वन

| म्हसळा | वार्ताहर |

महाराष्ट्रभूषण पुरस्कार कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील दोन दास भक्तांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. या शोकाकूल परिवाराचे आ. आदिती तटकरे यांनी  भेट घेऊन सांत्वन केले.

खारघर येथे झालेल्या दुर्घटनेत मयत 13 श्रीसदस्यांपैकी  म्हसळा तालुक्यातील एक महिला व एका पुरुषाचा अशा दोन दास भक्तांचा मयतांमध्ये समावेश आहे. म्हसळा तालुक्यातील वारल येथील रहिवाशी जयश्री जगन्नाथ पाटील (वय 52) आणि मेंदडी येथील महेश नारायण गायकर (वय 42) यांचा उष्मा घाताने मृत्यू झाला. यामुळे तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी मायतांचे घरी येवुन त्यांचे नातलगांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना धीर देताना हे दुःख सहन करण्याची ईश्‍वर ताकद देवो अशी आमदार आदिती तटकरे यांनी प्रार्थना केली. या वेळी त्यांचे समावेत महीला तालुका अध्यक्षा सोनल घोले, मिना टिंगरे, लहू म्हात्रे, महेश घोले आणि स्थानीक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version