आ. बाळाराम पाटील जुनी पेंशन मिळवून देतील- मनोज भगत

| आगरदांडा । प्रतिनिधी ।

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याबरोबरच शिक्षकांना जुनी पेंशन मिळावी यासाठी आ. बाळाराम पाटील यांनी पायी दिंडी नागपूर अधिवेशनात नेली होती. जुनी पेंशन मिळवून देण्यासाठी ते सक्रिय असून विविध आंदोलनाद्वारे ते शासनाचे लक्ष वेधून घेत असून त्यांच्या प्रयत्नांना निश्‍चित यश मिळणार असून ते जुनी पेंशन मिळवून देतील, असा आत्मविश्‍वास शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांनी व्यक्त केला आहे. श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूल येथे संपर्क अभियानात ते बोलत होते.

यावेळी चेरमन फैरोज घलटे, उत्तमराव वाघमोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अजीत कासार, सुपारी संघाचे संचालक प्रवीण चौलकर, मुरुड तालुका निरीक्षक व कोळखे ग्रामपंचायत सरपंच रोहन म्हात्रे, शेकाप मुरुड तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष रिजवान फहीम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोज भगत यांनी मार्गदर्श करणाताना म्हणाले कि, मागील निवडणुकीत बाद मतांची संख्या खूप मोठी होती. त्यामुळे शिक्षकांनी सहा क्रमांकावर असणार्‍या आ. बाळाराम पाटील यांच्या नावासमोर पसंती क्रमांक इंग्रजी आकडा एक टाकावा व आपले बहुमूल्य मत देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले कि, आज बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी जुनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय व शेतकरी कामगार पक्ष एकत्र येऊन खूप परिश्रम घेत आहेत. सदर कार्यक्रमात हायस्कूल चे सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version