विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी शेकाप आग्रही

आ.जयंत पाटील यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप
मुरुड । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांची प्रगती व्हावी, याकरिता शेकाप नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते मुरुड तालुक्यातील विहुर येथील मुलींना सायकलींचे वाटप शनिवारी (दि.22) करण्यात आले.

शनिवारी (दि.22) रोजी विहुर येथे सकाळी 11 वाजता आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गरीब गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी जिप सदस्या नम्रता कासार, विहुर सरपंच निलिशा दिवेकर, माजी सभापती चंद्रकांत कामाने, मनोज भगत तालुका चिटणीस, सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, माजी सरपंच अजित कासार, तुकाराम पाटील, मनोहर बैले, इंत्याज मलबारी, रमेश दिवेकर, फैसल उलडे, एकरार मोदी, सजाद उलडे, तला भाई व राहील कडू हे मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version