| कंधार | वार्ताहर |
कंधारच्या दौर्यावर आलेल्या शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी बहादरपूरा येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. श्यामसुंदर शिंदे , शेकाप मराठवाडा सह चिटणीस विक्रांत शिंदे उपस्थित होते.
या सर्वांचा ग्रामपंचायत बहादरपुरा तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य रोहित पाटील शिंदे, जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, अवधूत पाटील शिंदे, सभापती ज्ञानेश्वर चोंडे, लोहा खरेदी विक्री संघ उपसभापती श्याम अण्णा पवार, पुंडलिक पाटील बोरगावकर, कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अरुण पाटील कदम, सरपंच हनुमंत पेटकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई, अवधूत पेठकर, सरपंच हनुमंत कदम, सरपंच दुल्हे खान पठाण, गंगाधर पाटील चिखलीकर, बाळासाहेब गरजे, सोनू मोरे टेळकीकर, चेअरमन नागेश पाटील खांबेगावकर, सचिन कदम भारसावडेकर, सुधाकर सातपुते, गिरीश डिगोळे, शंकर शिंदे, नामदेव शिंदे, बळवंत मोरे, खुशाल मोरे, उस्मान भाई सह कार्यकर्ते उपस्थित होते.