आ.जयंत पाटील यांची वचनपूर्ती; नाभिक समाजाच्या सभागृहाचे भुमिपूजन

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात वरंडे ग्रामपंचायत हद्दीत आंबपूर येथे नाभिक समाजाच्या नवीन हॉल बांधकामाचे भुमिपुजन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (15 जानेवारी ) करण्यात आले.या सभागृहाची मागणी समाजाच्यावतीने करण्यात आली होती.ती पूर्ण करण्यात आल्याचे समाधान मिळाल्याचे आ.जयंत पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

चौल, रेवदंडा, आक्षी, नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नाभिक समाजाचे नूतन सभागृहाचे हॉल बांधकाम जयंत ाटील यांच्या आमदार फंडनिधीतून करण्यात येत आहे. नाभिक समाज चौल, रेवदंडा,आक्षी व नागाव यांचे वतीने विधान जागेसह समाज हॉल उभारणीची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा केला होता असे नाभिक समाजाचे अलिबाग तालुका अध्यक्ष विजय भोसले यांनी सांगितले.

विनायक पाटील यांच्या हस्ते पुजाविधी व भुमिपुजन करण्यात आले. यावेळी शेकाप नेेत संदीप घरत, वाघमोडे, आंबेपूर सरपंच सुधीर चेरकर, प्रकाश खडपे,नाभिक समाज अलिबाग तालुका अध्यक्ष विजय भोसले, नरेश भोसले, विजय आढाव, मनोज कदम, हरेश कदम,सचिन आंब्रे, समीर पवार, महेश घाडगे, व सर्व नाभिक समाज बांधव आदी उपस्थित होते.

Exit mobile version