बंडखोर आमदारांची गुंडगिरी;बिडीओसह तिघांना केबीनमध्ये मारहाण

असेसमेंटवरील अनधिकृत शिक्का काढण्यासाठी थयथयाट
| अलिबाग | प्रतिनिधी |
वेश्वी ग्रामपंचायतीमधील असेसमेंटवरील अनधिकृत शिक्का काढण्यासाठी आमदार आणि आमदार पत्नीने अलिबाग पंचायत समितीमध्ये गुरुवारी थयथयाट केला. यावेळी आमदारांचे बगलबच्चे राजा केणीदेखील उपस्थित होते.

कायदेशीररित्या सदर बदल करता येणार नसल्याचे बीडिओ नलावडे यांनी सांगताच संतापलेल्या आमदार महेंद्र दळवी यांनी बीडिओ नलावडे यांच्यासह विस्तार अधिकारी राठोड आणि अन्य एका अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेमुळे जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान अलिबाग पंचायत समितीचे बीडिओ नलावडे हे आजपासून रजेवर गेल्याचे समजते.

Exit mobile version