। माणगाव । प्रतिनिधी ।
गोरेगाव गवळआळी येथील रस्त्याचे काम गेल्या 15 वर्षांपासून रखडला असून सत्ताधारी आमदार विकासाच्या थापा मारत आहेत. अनेक वर्ष या भागातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्याने गोरेगाव येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी विकासाच्या थापा मारणार्या विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवणार असून स्नेहल जगताप यांना मतधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. तसेच, गोरेगाव भागात विकास कामाची पूर्तता करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी दिली आहे. यावेळी स्नेहल जगताप यांच्या समवेत डॉ. स्वीटी गिरासेंसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.