आ. जयंत पाटील यांची टांझानियाचे पंतप्रधान कासीम मजालिवा यांच्यासोबत भेट

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यवसायानिमित्त टांझानिया येथे गेले असता त्यांनी आवर्जून टांझानियाचे पंतप्रधान कासीम मजालिवा यांची भेट घेतली. डाव्या विचारांचा प्रभाव असलेल्या टांझानियात आ. जयंत पाटील यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे व्यवसायानिमित्त अनेक देशांचे दौरे करीत असतात. यावेळी तेथील विविध उद्योग, सामाजिक क्षेत्रातील बदलाचा अभ्यास करुन त्यानुसार मायदेशात विकासासाठी काय करता येईल याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यानुसार आ. जयंत पाटील टांझानिया येथे देखील व्यवसायानिमित्त अनेकदा जात असतात. यावेळी त्यांनी आवर्जून टांझानियाचे पंतप्रधान कासीम मजालिवा यांची भेट घेतली. यावेळी एक डाव्या विचाराच्या नेत्याच्या डाव्या विचाराच्या नेत्याने यथोचित स्वागत केले. याबाबत जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी चर्चेत व्यवसाय, नवीन उद्योगा बाबत काय काय नवीन उपाययोजना आपण करू शकतो याबद्दल सविस्तर चर्चा झाली.
याबाबत प्रतिक्रीया देताना आ. जयंत पाटील म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या, वाईट गोष्टी आणि घटना घडत असतात. घटनांकडे कोणत्या नजरेने व्यक्ती बघते यावरून त्या व्यक्तीच्या प्रगतीचा आलेख ठरविला जातो. त्यामुळे सर्वांची प्रगती होतेच असे नाही. योग्य नियोजन आणि साजेशी मेहनत वेळीच घेतली की रिजल्ट चांगले मिळतात. अफाट इच्छाशक्ती आणि काम करण्याच्या जिद्दीमुळे मला हा सातासमुद्रापारचा प्रवास करता आला. शेतकरी, डाव्या विचारधारेच्या कुटुंबात माझा पोयनाड येथे जन्म झाला. एक मराठी यशस्वी उद्योजक म्हणून आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहचू शकलो.

Exit mobile version