कर्जत तहसीलच्या विरोधात मनसेनेचे आंदोलन


। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तहसील कार्यालयातील शासकीय कामातील दिरंगाई बद्दल जाब विचारण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील जनतेचे सर्वाधिक कामे ही शासकीय पातळीवर तहसील कार्यालयाशी संबंधित असतात. तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (दि.18) कर्जत तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्यासह तालुका उपाध्यक्ष अकबर देशमुख, यशवंत भवारे, समीर चव्हाण, संतोष कदम, महिला तालुका अध्यक्ष आकांशा शर्मा, स्वीकृत नगरसेवक हेमंत ठाणगे, धनंजय दुर्गे, सतीश कालेकर, विनोद शेंडे, संदेश काळभोर, ऋषिकेश पाटील, हेमंत चव्हाण, पंकज बुंधाटे, ओंकार तरे, महिला शहर उपाध्यक्ष भारती कांबळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version