स्थानिकांना मिळणार रोजगार मिळवून देण्यासाठी मनसेचे प्रयत्न

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोरोना काळात मोठया प्रमाणावर रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनला, नोकरी व रोजगाराअभावी अनेकांवर घर कुटुंब कसे चालवावे हा प्रश्‍न पडला. सुशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. स्थानिक कंपन्यात स्थानिक व भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी मनसे सातत्याने प्रयत्नशील राहिली आहे. सुधागड तालुक्यातील टॉपवर्थ कंपनीमध्ये नोकरभरती व मुलाखती व्हाव्यात आणि भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कंपनीवर थेट धडक देण्यात आली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने स्थानिकांना रोजगार देण्याचे व उमेदवारांच्या मुलाखती या कंपनीतच घेणार असल्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे शैक्षणिक पात्रता व गुणवत्ता असून रोजगाराच्या शोधात असलेल्या असंख्य बेरोजगारांना जवळच्या कंपनीत नोकरीची संधी उपलब्द होणार असल्याने मनसेचे आभार मानले जात आहेत.

Exit mobile version