• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पालीत मोबाईल नेटवर्क ‘नॉट रिचेबल’च

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 20, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीत मोबाईल नेटवर्क ‘नॉट रिचेबल’च
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

पाली व परिसरात जिओच्या मोबाईल नेटवर्कची सध्याची अवस्था केवळ तांत्रिक बिघाडापुरती मर्यादित राहिलेली नाही, ती थेट ग्राहकांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरत आहे. मोबाईलवर सतत दिसणारा ‘नॉट रिचेबल’ हा संदेश, वाढते कॉल ड्रॉप आणि वारंवार ठप्प होणारी इंटरनेट सेवा हे आता अपवाद राहिले नसून जिओ ग्राहकांचे रोजचे वास्तव बनले आहे.

जिओने देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रचंड गुंतवणूक आणि दर्जेदार सेवेचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पालीसारख्या ग्रामीण-निमशहरी भागात हीच अत्याधुनिक यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. वर्षभराचे प्लॅन भरूनही फोन उपयोगात येत नसेल, तर ग्राहकांनी पैसे नेमके कशासाठी भरायचे, हा मूलभूत प्रश्न उभा राहतो.

पॅकेज संपले की क्षणाचाही विलंब न करता इन्कमिंग–आउटगोइंग कॉल बंद केले जातात. मात्र, पॅकेज सुरू असताना दर्जेदार नेटवर्क देण्याची जबाबदारी मात्र ढकलली जाते. ही सेवा नाही, तर केवळ वसुलीची व्यवस्था असल्याची भावना ग्राहकांमध्ये बळावत आहे. सेवा देण्यात अपयश येत असताना ग्राहकांनी गप्प बसावे, अशीच जिओची अपेक्षा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

ग्राहकसंख्या झपाट्याने वाढवताना त्या तुलनेत टॉवर क्षमता, नेटवर्क विस्तार आणि देखभाल याकडे दुर्लक्ष झाले आहे का, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. ग्राहकसंख्या आणि टॉवर क्षमतेतील तफावत वाढली असेल, तर त्याची किंमत ग्राहकांनी मनस्ताप सहन करून का भरावी? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गवगवा करून प्रत्यक्षात अपुरी सेवा देणे ही ग्राहकांशी फसवणूकच नव्हे काय?

आज पालीतील जिओ ग्राहकांचा सवाल साधा आहे सेवा हवी, जाहिरात नाही. रिलायन्स जिओ ने तातडीने नेटवर्कची वस्तुस्थिती स्वीकारून टॉवर क्षमता वाढवावी, कॉल ड्रॉप थांबवावेत आणि दर्जेदार सेवा द्यावी. अन्यथा ग्राहकांचा विश्वास, जो एकदा गमावला गेला, तो पुन्हा मिळवणे सोपे नसते हे जिओने लक्षात ठेवावे अशा संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांच्या येत आहेत.

”आम्ही वेळेवर पैसे भरतो, वर्षाचे पॅकेज घेतो. पण नेटवर्कच नसेल तर मोबाईल कशासाठी? अत्यावश्यक कॉलही होत नाहीत. पॅकेज संपले की लाईन बंद होते, मग पॅकेज असूनही रेंज देऊ शकत नसतील तर जिओ घ्यायचेच का?” हा सवाल केवळ एका ग्राहकाचा नसून संपूर्ण परिसराचा आहे.

-सचिन खिवंसरा
पालीतील व्यापारी जिओचे ग्राहक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMobile network not reachablenewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच हाणामारी

Next Post

रॅलीच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी
रायगड

रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी

February 20, 2026
Next Post
रॅलीच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृती

रॅलीच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?