। गडब । वार्ताहर ।
कासू रेल्वे स्टेशन येथे पनवेलकडे जाणारी रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबली असताना संतोष संभाजी चव्हाण रा. गोवंडी मुंबई हे रेल्वे डब्याच्या दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलत होते. त्यांच्या हातातील ओपो कंपनीचा 18,000 रूपये किंमतीचा मोबाईल फोन अनोळखी इसमाने अंधाराचा फायदा घेऊन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली होती. वडखळ पोलिसांनी शीघ्रगतीने तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक पुराव्याचे आधारे प्रथम सदरचा मोबाईल फोन ईरवाडी येथील एका महिलेकडून जप्त केला. तसेच या प्रकरणी मोबाईल हिसकावून नेणारा निलेश परशुराम तांडेल याला अटक केली.