| उरण | वार्ताहर |
उरण कृषी विभाग रायगड जिल्हा परिषदेकडील केंद्र, राज्य पुरस्कृत व जिल्हा परिषदेच्या सन 2022-23 सालासाठी सेस योजना शेतकर्यांसाठी मंजूर झाल्या आहेत. नव बौद्ध शेतकर्यांसाठी नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंप सेट, वीज जोडणी , शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक संच, तुषार संच आदी योजना मंजूर आहेत.
राज्य शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या शेतकर्यांसाठी नवीन विहीर, जुनी विहीर , दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंपसेट, वीज जोडणी, शेततळ्याच्या साठी प्लास्टिक अस्तरिकलरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक संच, तुषार संच, पाईपलाईन, परसबाग आदि योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन उरण पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी ईश्वरचंद्र चौधरी व विस्तार अधिकारी प्रतिमा गोरे यांनी उरण तालुक्यातील शेतकर्यांसाठी केले आहे.