सुकेळी येथून मोबाईल चोरीला

चोराचा फोटो कॅमेर्‍यात कैद
गोवे-कोलाड | वार्ताहर |
सुकेळी येथील आशीर्वाद पान शॉप येथून रेलमी सी.25 हा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला असून, चोरट्याचा फोटो कॅमेर्‍यात कैद झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुधवार, दि.20 ऑक्टोबर रोजी सुकेळी येथील जिंदल कंपनीसमोर असणार्‍या आशीर्वाद पान शॉप येथून सुनील कुमार उर्फ दिप कुमार यांचा रेलमी सि.25 हा दहा हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने लंपास केला आहे. त्याचा फोटो कॅमेर्‍यात कैद झाला. हा मुलगा दोन दिवसांपूर्वी आशीर्वाद हॉटेल येथे कामाला आला होता. तो आपले कपडे घरून घेऊन येतो. असे कारण सांगून मोबाईल लंपास करुन गेला. हा मुलगा इंदापूर तळा या भागातील असून, त्याचे नाव मात्र समजू शकले नाही. परंतु फोटोमधील मुलगा जर कोणाला दिसून आला, तर सुकेळी आशीर्वाद पान येथील सुनील कुमार यांच्या संपर्क साधावा, असे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version