मोदी सरकार भ्रष्टाचाराच्या विळख्यात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अब की बार मोदी सरकार अशी घोषणा देत केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार आता कॅगच्या कचाट्यात सापडू लागले आहे. या अहवालात अनेक योजनांमधील घोटाळ्याची बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे कॅगच्या अहवालातील घोटाळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याशी संबंधित असल्याने गडकरींना घेरण्यासाठी हे घोटाळे उघडकीस आणले जात आहेत का,असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे कॅगच्या अहवालातून उघड झाले आहे.

कॅगचा अहवाल आल्यानंतर आणि या अहवालात अनेक योजनांमधील घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेसला मोठा मुद्दा मिळाला आहे. या अहवालावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

सुप्रिया श्रीनेत उपरोधिकपणे म्हणाल्या की, एक संस्था प्रामाणिक पंतप्रधानांना भ्रष्ट म्हणत आहे. यावर पंतप्रधानांनी कठोर कारवाई करावी. याविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांना पाठवुन धडा शिकवला पाहिजे. पीएम मोदींची प्रतिमा मलिन करणाऱ्या या संस्थांना देशद्रोही ठरवावे, त्यांना तुरुंगात टाकावे.फफ

कॅगच्या अहवालातील घोटाळे?
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेल्या 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची वसुली,आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल नंबर वरून नोंद अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन रम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.

Exit mobile version