शहा, राजनाथ, गडकरींना पुन्हा तेच मंत्रालय
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लागोपाठ तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या घटकपक्षांच्या खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली, यानंतर सोमवारी (दि.10) या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकर, एस जयशंकर, निर्मला सितारामण यांना पुन्हा तीच खाती देण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही पाच प्रमुख खाती ही भाजपकडेच ठेवली आहेत.
असे असेल मोदींचे मंत्रिमंडळ राजनाथ सिंह - संरक्षण, अमित शाह - गृह, अश्विनी वैष्णव - रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एस. जयशंकर - परराष्ट्र, नितीन गडकरी - परिवहन व रस्ते विकास, अजय टमटा - परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री, हर्ष मल्होत्रा - परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री, मनोहरलाल खट्टर - ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय, शिवराज सिंह चौहान - कृषी आणि किसान कल्याण व पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय, जीतन राम मांझी - लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय, निर्मला सीतारमण - अर्थ मंत्रालय, सीआर पाटील - जलशक्ती मंत्रालय, जे.पी. नड्डा - आरोग्य मंत्रालय, चिराग पासवान- क्रीडा, किरेन रिजिजू - संसदीय कार्य, मनसुख मांडविया - कामगार, श्रीपाद नाईक - ऊर्जा राज्यमंत्री, अनुपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास, राम मोहन नायडू - नागरी उड्डाण, सर्वानंद सोनोवाल - पोर्ट शिपिंग, शांतनू ठाकूर - पोर्ट शिपिंग राज्यमंत्री, शोभा करंदलाजे- सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान - शिक्षण, एचडी कुमार स्वामी - अवजड उद्योग, शोभा करंदलाजे - सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया - टेलिकॉम, भूपेंद्र यादव -पर्यावरण, प्रल्हाद जोशी - ग्राहक संरक्षण, रवनीत बिट्टू - अल्पसंख्याक राज्यमंत्री, गजेंद्र शेखावत - कला, पर्यटन, सांस्कृतिक, सुरेश गोपी - कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री, पीयूष गोयल - वाणिज्य.
महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट, चार राज्यमंत्रीपद मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेटमंत्री करण्यात आलं आहे. तर 4 खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आलं आहे.