। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशभरात दोन दिवसपूर्वी पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या संघटनेकडून पंतप्रधान मोदी यांच्या जुलै 2022 रोजी पाटण्यातील झालेल्या रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच यूपीतील काही संवेदनशील ठिकाणांवरही हल्ला करण्याच्या तयारीत संघटना होती. असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
केरळमधून अटक केलेल्या पी.एफ.आय सदस्य शफिक पायेथच्या विरोधात रिमांड नोटमध्ये ईडीने हा खळबळजनक दावा केला आहे. ईडीकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोदींच्या पाटणा दौर्यादरम्यान हल्ला करण्यासाठी पी.एफ.आयकडून 12 जुलै 2022 रोजी प्रशिक्षण शिबिराची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे 2013 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांनी त्यांच्या रॅलीमध्ये स्फोटही घडवला होता. असेही ईडीने म्हटले आहे.