| पाटणा | प्रतिनिधी |
पाटणा येथील जाहीर सभेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जीभ घसरली. या सभेला संबोधित करताना सीएम नितीश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हटले. रविवारी सीएम नितीश पाटणा साहिबमधील भाजपचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांच्या प्रचारासाठी दनियावन येथे आले होते. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आम्हाला बिहारमधील सर्व 40 आणि देशभरातील 400 हून अधिक जागा जिंकायच्या आहेत आणि नरेंद्र मोदींनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, जेणेकरून देशाचा विकास होईल आणि बिहारचा विकास होईल. हे ऐकून तिथे उपस्थित लोक हसू लागले. त्यांच्या शेजारी उपस्थित असलेल्या नेत्यांनी नितीश कुमार यांना अडवलं आणि म्हणाले ते पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री नाहीत. याबाबत ते म्हणाले की, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत आणि यापुढेही राहतील. नितीश यांचे हे शब्द ऐकून मंचावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या.